मुंबईतील गिरणगाव लालबाग येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. वडील टाटा मिल मध्ये नोकरीला होते. शालेय शिक्षण शिरोडकर हायस्कूल मध्ये झाले. शालेय जीवनापासून समाजसेवेची, पर्यावरणाची तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याची हौस होती. महाविद्यालयीन शिक्षणा दरम्यान विद्यार्थी संघटना मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली. तरुणपणी मुंबई शहर नागरिक संघटना स्थापन करून लोकांचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल होतो. या संघटनेचे महत्वाचे असे सरचिटणीसपद भूषविले आणि लोकोपयोगी कामे केली. लालबाग मध्ये वृक्षारोपण स्वछता हा मूलमंत्र आम्ही १९८३ साली दिला आणि राबविला. युवकांना एकत्रित करण्यासाठी युवक क्रांती संघटना स्थापन करून बांधली. या संघटनेचे सरचिटणीस पद भूषविले. संघटनात्मक कौशल्या मूळे संघटना वाढीस हातभार लागला. भारतातील पहिल्या एकदिवसीय राज्य पातळीवरील कॅरम स्पर्धेचे यशस्वी आयोजन लालबाग येथे करून दाखविले. महाराष्ट्रातील सर्व मानांकित कॅरमपटूंनी यात सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यात हातभार लावला. ही संकल्पना मी आणि माझें सहकारीमित्र श्री. प्रभाकर तथा बाळ नाईक यांच्या संकल्पनेतून साकारली. भारतातील वन डे मुंबई जिल्हा पातळीवरील कॅरम स्पर्धा मुंबईत प्रथमच यशस्वीरित्या आयोजित केली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व नामांकित कॅरमपटूनी भाग घेतला. मध्यरात्री दोन वाजता अंतिम सामना खेळविला गेला ही भारतातील एकदिवसीय प्रथम स्पर्धा ही विशेष बाब आणि हे सर्वप्रथम केल्याचा मान. मुंबईत १९८४ साली ५००० तरुण याचे सभासद होते. लालबाग, परळ, नायगाव, दादर, लोअर परेल, वरळी, माझगाव इत्यादी विभागात पर्यावरण जागरूकता करून तरुणांना रोजगार, क्रीडा प्रोत्साहन,कलेसाठी प्रोत्साहन दिले.समाजकारणाचा वसा असाच कायम ठेवीत आणि आपल्या मूळ गावाचे म्हणजेच ऋण लक्षात ठेवून कोकणची बांधिलकी जपण्यासाठी कोकण मित्र मंच या पक्ष विरहित संघटनेची स्थापना केली. याकामी मित्र सर्वश्री जयंत पाटकर, लंकानाथ झेंडे, नरेश अग्रवाल, ऍड. नरेश जाधव, गजानन चव्हाण यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विशेष सहकार्य परममित्र श्री. सुरेश देशमुख यांचे लाभले. आमचे या चळवळीतील सहकारी आणि मित्र श्री. जयंत पाटकर यांच्या संकल्पनेतून कोकणात सर्वप्रथम सरकारी नोकरी साठी युवकांना मार्गदर्शन तसेच याकामी विनामूल्य प्रशिक्षण देऊन तयारी करण्यासाठी योजना राबविल्या. याकामी प्रशिक्षण तज्ञ आणि सरकारी नोकरी मार्गदर्शक आणि कोकणसुपुत्र श्री. स्वप्नील मुंज त्यांचे बहुमोल सक्रिय सहकार्य लाभले. त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे कोकणातील जवळपास १२५ लोकांना सरकारी नोकरी मिळाली आणि ते सुद्धा विनामूल्य एकही रुपया खर्च न करता हे विशेष. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा कशी द्यावी आणि त्यात १००% कसे उत्तीर्ण व्हावे आसनी यश संपादन करावे यासाठी तरुणांना मोफत मार्गदर्शन. कोकणातील सुप्रसिद्ध अग्नी वेताळ देवस्थान च्या माध्यमातून अदृश्य जलसंधारण योजना राबविण्यास सुरुवात केली. रिचार्जिंग बोअरवेल ही वेगळी संकल्पना कोकणात राबविन्यासाठी सतत प्रयत्नशील. या योजनेमुळे कोकणात पाण्याचा मुबलक साथ निर्माण होईल. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील पाटगाव ही ग्रामपंचायत कोकण मित्र मंचाची पहिली अधिकृत दत्तक ग्रामपंचायत. पर्यावरण,स्वछता आणि प्रथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या गावाची निवड केली. गावातील शाळेमध्ये पर्यावरण, वृक्ष लागवड आणि यामुळे आपले होणारे फायदे विद्यार्थी वर्गाला पटवून जनजागृती करीत आहोत. पाटगाव या गावातील औषधी वृक्ष संपदा इतर गावांमध्ये प्रसार करून त्याचा प्रसार आणि लागवड केली. पाटगाव मध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, खोकला, मूळव्याध, बाईचे अंगावर जाणे इत्यादी रोगांवर समूळ नष्ट करणाऱ्या वनौषधी उपलब्ध आहेत त्यांचे संगोपन केले.
महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून राळेगण सिद्धी, हिवरे बाजार, पाटोदा यांचा उल्लेख केला जातो. कोकण मित्र मंच नक्कीच प्रयत्नशील राहून पाटगाव ग्रामपंचायतीला महाराष्ट्राच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून आणि आदर्श ग्रामपंचायत बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील यात तिळमात्र शंका नाही.
कोकण मित्र मंच या सेवाभावी प्रामुख्याने पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेची पर्यावरण तज्ञ श्री. सतीश फाटक यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली खालील कामाला सुरुवात केली. महाराष्ट्रात जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविण्याचे पालकत्व घेतले. कोकणातील रायगड, रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले. सावंतवाडी येथील आजगाव येथील पुरातन अग्निवेताळ या मंदिर देवस्थानच्या सहकार्याने अग्निवेताळ अदृश्य जलसंधारण योजना राबविण्यास सुरुवात केली. याकामी मुंबई महानगर पालिकेचे मुख्य जल अभियंता ( निवृत्त) श्री. टी. व्ही. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित होत आहे. ही संकल्पना रिचार्जिंग बोरवेलची आहे. या योजने मुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते आणि आपल्याला जास्त पाणी वापरावयास मिळते. अशा अजून ४ योजना लवकरच रायगड मध्ये २ आणि रत्नागिरी येथे २ योजना राबविण्यात येणार आहे यासाठी योग्य जागेची पाहणी प्रा. सतीश फाटक आणि इतर तज्ञ पाहत आहेत. पाण्याची साठवणूक गरजेची आणि वेळीच उपाय शक्य अन्यथा आपण सगळे भिकारी .......
पाणी ही आजच्या जगातील सर्वात ज्वालाग्राही गोष्ट आहे. कोणत्याही देशाचे जगातले स्थान, त्याच्याकडे किती तंत्रज्ञान आहे किती मनुष्यबळ आहे, किती साधनसंपत्ती आहे यावर ठरणार नाही; पाणी ही सर्वात महत्वाची साधनसंपत्ती आहे आणि त्याचे नियोजन त्याने कसे केले आहे यावर ठरेल. इस्रायल पॅलेस्टाईन यांच्या युद्धाचे वगरे कारण पाणी हे आहे आणि येणारे महायुद्ध हे नाकी पाण्यावरून होईल हे त्रिवार सत्य आहे. पाण्यासाठी होऊ घातलेल्या योजना प्रामाणिकपणे राबविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी सर्व तज्ञ सरकारी, निमसरकारी, समाजसेवी संस्था, समाजसेवक यांचे सहकार्य घेण्याची गरज आहे. छोटे बंधारे, छोटी धरणे, गावागावात विविध लोकोपयोगी पाणी साठवणुकीच्या योजना, रिचार्जिंग बोअरवेल सारखे कमी खर्चिक योजना राबविण्याला प्राधान्य देणे आवश्यक. काल समाजाने लाथाडलेला नर्मदा प्रकल्प आज त्या विभागाच्या विकासासाठी वरदान ठरला आहे त्यामुळे बऱ्याच वेळा काही तथाकथित समाजसेवक लोकांची दिशाभूल करतात म्हणून प्रत्येकाने फार सावधतेने विचार करून मगच पाठिंबा किंवा विरोध करावा ही विनंती. प्रतिहेक्टर प्रति मिलिलिटर पाण्यामागे मिळणारे रुपये
पीक। सिंचनासाठी लागणारे पाणी। हेक्टरमागे मिळणारे वाढीव उत्पन्न %उत्पन्न
तांदूळ ७१४ ७१०२ १२.३७
गहू। ४१६ ४१६५ १०.०१
बाजरी ५५ ३२०९ ५८.३४
भुईमूग ९५ ५६२४ ५९.२०
तंबाकू ३८४ ६१४५ १६.००
कापूस ५०३ ९५५२ १८.९९
महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या विभागात कोणती संमिश्र पिके घेणे अधिक लाभदायक आहे हे ठरविण्यासाठी प्रयोग करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करायला हवा.प्रत्येक पिकासाठी हेक्टरमागे सिंचनासाठी किती पाणी लागते हे माहीत असल्याने शेतकऱ्यांना तेव्हढे पाणी उपलब्ध करून देता येईल.त्यातूनही या पाण्या पैकी भूगर्भातून उपलब्ध असलेले पाणी त्याला आधी द्यावे लागेल वाट्याचे नियोजन करावे लागेल. फार महत्वाची गोष्ट काही शेती तज्ञ मांडतात ती याप्रमाणे शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात आपण फक्त तांदळाची किंमत लक्षात घेतो. पण शेतकरी काही तांदूळ पिकवत नाही तर भात पिकवतो. भातापासून तांदळाबरोबर कडबा,टरफले कोंडा या गोष्टी मिळतात भातामध्ये ३६ टक्के तांदूळ ५० टक्के कडबा,१०टक्के टरफले व ४ टक्के कोंडा ( Bran) असतो. आता कोंड्यापासून तेल मिळवण्याचे तंत्रज्ञान आपल्या देशात अगोदरच विकसित झाले आहे. कडबा वापरून आपण कार्डबोर्ड बनवू शकतो व हा उद्योग चालू आहे. तरफलापासून सिमेंट बनविले जाते हे ४० वर्षा पासून चालू आहे. दहा हजार हेक्टरमध्ये सलगपणे भात पिकविला जात असेल तर या उद्योगाचे जाळे निर्माण करणे फायदेशीर आहे हे सर्व कृषी तज्ञ सांगतात. तांदळा बरोबर कोंडा, टरफले, कडबा यांचे नवे मूल्य आपणास विचारात घ्यावयास हवे. आधुनिक जग हे तज्ज्ञांचे जग आहेही आपण मान्य करावयास हवे . पण त्याचवेळी तज्ञ फाजील आत्मविश्वासाने, निष्काळजीपणामुळे व इतर स्वार्थासाठी व दडपणाखाली चुका करण्याची सुद्धा दाट शक्यता पण असते. चर्चा करून यातून योग्य असा मार्ग काढणे अत्यंत गरजेचे. आपल्या देशात प्रत्येक तांत्रिक विषयात मान्यवर व्यावसायिक संस्था आहेत. या सरकारी, निमसरकारी आणि सार्वजनिक अशा स्वरूपात आहेत. अशा संस्थाच्या मदतीने परिसंवाद आयोजित करून सर्वसमावेशक मत घेता येते. खरी गरज या देशातील विकास प्रकल्प झपाट्याने बनविणे, पारखून घेणे व अंमलात आणणे ही आहे. यासाठी दबाव आणू शकणारे कार्यकर्त्यांचे आणि समाजसेवी संस्थांचे गट व खुले आम चर्चा करणारी व्यासपीठ हवी आहेत व या देशातील सर्वसामान्य माणसांचे आपण सारे जण खरोखरच काही देने लागतो या सामाजिक भावनेतून कोकण मित्र मंच याकामी पुढाकार घेत आहे.
यक्षाने धर्मराजाला त्याचा तो आवडता प्रश्न विचारला, ' या जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती?'
धर्मराज मनापासून हसला. त्याने इकडे तिकडे पाहिले. दूरवर उभे असलेले, तहानेने व्याकुळ झालेले कोणी ऐकत नाहीत याचा सावध अंदाज घेतला. मग तो म्हणाला,' तुझा प्रश्न एकूणच मजेशीर आहे'. माझा वेळ फार मजेत गेला पण एक सांग तुझा प्रश्न आणि तहानेने कासावीस झालेल्या लोकांनी पाणी का पिऊ नये याचा आपापसांत काही तरी संबंध आहे का ? आणि अनादी काळापासून तुला कार्यकर्ता व मला विचारवंत समजून सहन करीत आहेत आणि असेच सहन करीत राहणार आहेत हेच जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. शेती साठी सर्वांनी एकत्र येऊन केल्यास नक्कीच उत्पन्न वाढेल तसेच इतर विदेशी फळे, विदेशी फुले यांची लागवड करणे आवश्यक आहे. आम्ही कोकणात चंदन, रक्तचंदन, पुत्रांजीव, भेडा, गूंज, शमी आणि इतर दुर्मिळ आणि औषधी वनस्पती यांचे बिया आणि रोप वाटप करीत आहोत. आपल्याकडे फणसाची झाडे लावली जातात परंतु यांना फळे फक्त काही कालावधी साठी येतात पण याच प्रजातीतील डुरियन( विदेशी फणस) या झाडाला बारमाही फळे येतात आणि यांना चांगला बाजार भाव आहे तरी मित्रांनो वेळीच सावध होऊन पाणी साठवणूक आणि याचे सूत्रबद्ध नियोजन करण्यासाठी एकत्र येऊन सर्वसमावेशक कमी खर्चिक कामे सुरू करून देशाच्या विकासास हातभार लावण्याचे काम कोकण मित्र मंच करीत आहे.
वनश्री पुरस्कार विजेते डॉ. महेंद्र घागरे हे महाराष्ट्रात चंदन लागवडीसाठी झटणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. गेली १५ वर्षे चंदन लागवडीसाठी अविरत झटत आहेत. कोकणासाठी त्यांचे विशेष प्रेम आहे आणि कोकण मित्र मंचाच्या बरोबरीने मोफत चंदन रोपे आणि इतर दुर्मिळ आणि उपयोगी झाडांच्या बिया विनामूल्य दिल्या जातात. मार्च महिन्याच्या शेवटी आंबा, काजू, फणस, चिकू, पेरू, जांभूळ इत्यादी अनेक फळ बाजारात उपलब्द असतात आणि आपण सर्रास घरी आणून खात असतो. या व्यतिरिक्त बऱ्याच देशी विदेशी फळांचे सेवन करतो. कोजन मित्र मंचाची आपणास कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की या फळांच्या बिया स्वच्छ पाण्याने धुवून दुधाच्या खाली झालेल्या पिशवीत ठेवाव्या. पावसाळ्यात ज्या वेळेला आपण वर्षा पर्यटनाला जाल त्यावेळेस या बिया डोंगराच्या आसपास तसेच जिथे मोकळी जागा असेल तिथे फेकाव्या जेनेकरून याचे रूपांतर झाडात नक्की होऊ शकेल. गेल्या वर्षी या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच कोकण वासीयांनी दूरध्वनी करून याची माहिती घेतली. आपणास मोफत चंदन रोपे तसेच बियाणे हवी असल्यास कोकण मित्र मंच मार्फत उपलब्द होऊ शकतात.
हरित मित्र परिवाराचे संस्थापक आणि प्रा. सतीश फाटक यांचे मित्र डॉ. महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने मोफत चंदन आणि औषधी झाडांच्या बियांचे वाटप महाराष्ट्रात तसेच भारताच्या कानाकोपऱ्यात करण्याचा मानस आहे. हे काम गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. चंदनाच्या झाडाला मशागत कमी लागते आणि ते पर्यावरप्रेमी झाड आहे तसेच एक चंदनाचे झाड शेतकऱ्याला शाश्वत एक करोड उत्पन्न देते. पर्यावरणाला पूरक आणि लोकोपयोगी अशी उपयोगी झाडे लावून जगवीत आहोत. आता पर्यंत या वर्षी जवळपास दोन लक्ष बियाणांचे वाटप केले आहे यामध्ये हरित मित्र परिवार नेहमीच आमच्या बरोबर प्रोत्साहन देत कार्यरत असतो. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांनी यात उत्साहाने भाग घेतला आहे. विद्यार्थी, शालेय शिक्षक, मुख्याध्यापक आणि इतर सेवक वर्गाचे सहकार्य आम्हाला नेहमीच लाभले आहे.
या वर्षी जवळपास १० लक्ष वृक्ष लागवड आणि जवळपास ३ कोटी चंदन आणि तत्सम औषधी आणि उपयोगी बियाणांचे वाटप करण्याचा मानस आणि विडा उचलला आहे. कोकण मित्र मंचाचे अध्यक्ष आणि पर्यावरप्रेमी तज्ञ प्रा.सतीश फाटक यांच्या या योजनेत सर्व सुकाणू समिती सदस्य आणि सभासद हिरहिरीने भाग घेत आहेत. पर्यावरण जागृती शिबिरांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.औषधी वनस्पती च्या संबंधी कोकण मित्र मंचाकडे खालील वनस्पतींची बद्दल माहिती उपलब्ध आहे. जसे बेणे किंवा रोप किंवा बियाणे, लागवडीचे तंत्र, काढणी पश्चात तंत्र याची माहिती , सर्वात महत्वाचे म्हणजे औषधी वनस्पतीची लागवड केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
1.अश्वगंधा ( Withania somnifera)
२.शतावरी ( Asparagus racemosus)
३. पाषाण भेद/ माईन मुळा / कोलियस ( Coleus froskolli )
४. गोखरू / सराटे (Tribulus terresteris)
५. सर्पगंधा (Rauwolfia serpentina )
६. गुडमार / मेषश्रृंगी ( Gymnema sylvestris)
७.मधुपर्णी / स्टिव्हिया ( Stevia rubadenia)
८.तुळस (Ocimum sanctum)
इतर बरेच, म्हणजे जवळपास ५२-५४ वनस्पतींची यादी आहे ज्यांची सर्वांनी लागवड केली पाहिजे यासाठी कोकण मित्र मंचाचे पर्यावरण प्रेमी तज्ञ अध्यक्ष प्रा. सतीश फाटक यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणहित संकल्पा अंतर्गत कोकण मित्र मंच आणि हरित मित्र परिवार यावर्षी कोकणात ३००००००० बिया तसेच रोप वाटप करण्याचा संकल्प घेतला आहे. यामध्ये चंदन,पुत्रांजीव, गूंज, शमी,भेडा, साग, बिब्बाआणि दुर्मिळ वनौषधी बियांचे आणि रोपांचे वाटप सुरू केले आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील १५ शाळांमध्ये १००००० बियांचे वाटप नुकतेच करण्यात आले यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतीतील शाळांमध्ये ५०००० बियांचे वाटप करण्यात आले. या रोपांचे पालकत्व घेण्यासाठी योग्य अशा विद्यार्थी वर्गांची निवड केली आहे. शाळेतील शिक्षक वर्ग हा त्यांना योग्य असे मार्गदर्शन आणि साहाय्य करेल. आमचा मानस किंबहुना संकल्प कोकणातील सर्व शाळांना सहभागी करून घेण्याचा आहे आणि आम्ही तो साध्य करणार याकामी आम्हाला प्रशासनाचे १००% सहकार्य मिळेल यात तिळमात्र शंका नाही. शासनाच्या वन विभाग, कृषी विभाग यांचे सहकार्य मिळावे अशी माफक अपेक्षा.आम्ही नवीन झाडे लावण्यासाठी आग्रही आणि त्याची सूत्रबद्ध आखणी करीत आहोत. गेली दोन वर्षे यासाठी आम्ही झटत आहात गेल्या वर्षी आम्ही १००००० बिया आणि रोप वाटपाचा संकल्प सह्याद्री कृषी सन्मान सोहळ्यात केला होता आणि आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की आम्ही बियांचे आणि रोपांचे वाटप १२०००० केले आणि आम्ही यातून ४६९०० रोपे जागविले आहेत आणि या झाडांचे पालकत्व कोकण मित्र मंचाचे कोकणातील सदस्य आणि कार्यकर्ते यांनी घेतले आहे. कोकणातील सर्व कोकण मित्र मंचाचे सदस्य आणि कार्यकर्ते यासाठी दिवस रात्र झटत आहेत. कोकणातील सर्व शाळांच्या पातळीवर तसेच गाव पातळीवर बियांचे रूपांतर रोपटं आणि रोपांचे रूपांतर झाडात आशा अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिक्षणाखाली विजेते घोषीत केले जातील. ही स्पर्धा गाव, तालुका , जिल्हा पातळीवर आयोजित केली आहे. कोकणातील उत्कृष्ट शाळेला विशेष पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत. या सर्व प्रकल्पाचे नियोजन हे कोकण मित्र मंचाचे पर्यावरणप्रेमी अध्यक्ष प्रा. सतिश फाटक, हरित मित्र परिवाराचे संस्थापक डॉ. महेंद्र घागरे, कोकण मित्र मंचाचे सल्लागार आणि दैनिक कृषिवलचे प्रमुख संपादक श्री. प्रसाद केरकर, मराठी व्यापारी पेठेचे कार्याध्यक्ष आणि कोकण मित्र मंचाचे सल्लागार श्री. अनंत भालेकर, कोकण मित्र मंचाचे सल्लागार श्री. सुरेश देशमुख,कोकण मित्र मंचाचे सरचिटणीस ऍड. नरेश जाधव, कोकण मित्र मंचाचे सुकाणू समितीचे सदस्य आणि जेष्ठ पत्रकार श्री. संदेश सावंत तसेच कोकण मित्र मंचाचे सुकाणू समिती सदस्य श्री. लंकानाथ झेंडे, श्री. नरेश अगरवाल, कुमारी. पूनम वेंगुर्लेकर, पाटगावचे सरपंच श्री.विजय कुंभार, पाटगावचे उपसरपंच श्री.देवेंद्र गवंडी,श्री.मटकर, श्री.नितीन जरकरी, श्री. दिलीप गवंडी, श्री. किशोर गवंडी इत्यादी सर्व सदस्य दिवस रात्र मेहनत करीत आहेत. कोकणातील सर्व जनतेचा सहभाग आम्हाला मिळेल असा दाट विश्वास आहे.
कोकण मित्र मंच आणि हरित मित्र परिवार यावर्षी (२०२१)कोकणात ३००००००० बिया तसेच १०००००० रोप वाटप करणार. यामध्ये चंदन,पुत्रांजीव, गूंज, शमी,भेडा, साग, आणि बऱ्याच वनौषधी बियांचे आणि रोपांचे वाटप सुरू केले आहे. आमचा मानस किंबहुना संकल्प कोकणातील सर्व शाळांना सहभागी करून घेण्याचा आहे. याकामी आम्हाला प्रशासनाचे १००% सहकार्य मिळेल यात तिळमात्र शंका नाही. शासनाच्या वन विभाग, कृषी विभाग यांचे सहकार्य आहे. कोकणातील सर्व कोकण मित्र मंचाचे सदस्य आणि कार्यकर्ते यासाठी दिवस रात्र झटत आहेत. कोकणातील सर्व शाळांच्या पातळीवर तसेच गाव पातळीवर स्पर्धांचे आयोजन केले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिक्षणाखाली विजेते घोषीत केले जातील. ही स्पर्धा गाव, तालुका , जिल्हा पातळीवर आयोजित केली आहे. कोकणातील उत्कृष्ट शाळेला विशेष पारितोषिक देऊन सन्मान करणार आहोत. चंदन, रक्त चंदन, शमी, शिसम, खाया इत्यादी दुर्मिळ आणि औषधी आणि उपयोगी तसेच दीर्घकालीन उत्पन्न देणाऱ्या आणि कमी मशागत लागणाऱ्या वनस्पतींच्या बियांची लागवड करणे. याची देखभाल विद्यार्थी वर्गामार्फत करणे गरजेचे जेणेकरून याच्या यशाचे प्रमाण वाढते. साधारण आम्ही एक लाख बियाणांचे मोफत वाटप रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार आहोत.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी
पक्षीही सुस्वरे आळविती
पर्यावरण समतोल राखीती
चला सुरुवात करूया पर्यावरणासाठी
आपले योगदान देऊया झाडे लावून
पाणी वाचवू उगाच वाया जाऊ न देता
पाणी हेच जीवन आणि हाच पर्यावरण संदेश
कोकण मित्र मंचाच्या ह्या पावन पर्यावरण चळवळीत सक्रिय सहभागी होऊन उद्याचा पर्यावरण युक्त देश आणि राज्य घडवूया.
करू नका वृक्षतोड
तोडू नका वनसंपत्ती,
नका घेऊ मुक्या पक्षांचे प्राण
करूया जनजागृती
सांभाळू निसर्गक्रांती
जय पर्यावरण.....!!!!!
आपण कोकण मित्र मंचाच्या पर्यावरण हित चळवळीची आणि कोकण मित्र मंचाचे पर्यावरण तज्ञ प्रेमी अध्यक्ष श्री सतीश फाटक आणि हरित मित्र परिवाराचे संस्थापक डॉ महेंद्र घागरे हे चंदन तज्ज्ञ आहेत. भारतभर चंदन लागवडीसाठी हे दोघे झटत आहेत. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे या गावात ५०००० चंदन बियाणांचे मोफत वाटप आणि चंदन आणि तत्सम औषधी बियाणांच्या संधर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन कोकण मित्र मंच आणि हरित मित्र परिवार करीत असतो. राजस्थान सरकार वन विभागातर्फे गोदाम की तलाई दुर्गापूर रोड झालावड येथे ५०००० चंदन आणि तत्सम औषधी बियाणांचे वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. आम्ही लावलेल्या चंदनाच्या रोपांचे पालकत्व आम्ही घेतो हे विशेष नमूद करावेसे वाट्ते. महाराष्ट्र शासनाने आमच्या सेवेचा नक्की लाभ उठवावा अशी विनम्र विनंती.
आपला स्नेहशील
प्रा.सतीश फाटक
अध्यक्ष
कोकण मित्र मंच
८१६९७३०३४५